मोबाईल टिव्ही बघू देत नाहीत, मुलांनी घेतली पालकांविरोधात पोलीस स्थानकात धाव

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. टिव्ही-मोबाईल घेण्यापासून पालकांनी रोखल्याने चक्क मुलांनी आई-वडिलांविरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी कुटुंबियांविरोधात जुवैनाइल जस्टीस अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मध्य प्रदेशातील इंदूरमधील ही घटना आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चंदन नगर ठाणे परिसरातील 21 वर्षीय मुलगी आणि 8 वर्षाच्या मुलाने चक्क आई-वडिलांविरोधात पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. मुलांनी आरोप केला आहे की, आई वडिल त्यांना मोबाईल आणि टिव्ही बघायला देत नाहीत. त्यामुळे त्यांना रोज ओरडा मिळतो. यामुळे घरात कायम वाद होतात. मुलांना पालकांची ही गोष्ट इतकी खटकली त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत आई-वडिलांविरोधाीत तक्रार दाखल केली,

मुलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी बाल न्याय कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. कारवाई करत पोलिसांनी पालकांविरुद्ध चालानही सादर केले, तर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली. या प्रकरणाला पालकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. मुलांच्या या पराक्रमाने केवळ त्यांच्या कुटुंबीयांनाच नाही तर इतर लोकांनाही आश्चर्य वाटले.

वकिल धर्मेंद्र चौधरी यांच्या याचिकेनुसार, 25 ऑकर्टोबर 2021 मध्ये ती दोन्ही मुलांना घेऊन पोहोचली होती. दरम्यान पोलिसांनी सांगितले की, आई-वडिल मोबाईल आणि टीव्हि पाहण्यापासून रोखतात आणि ओरडतात. याप्रकरणी पोलिसांनी जुवैनाइल जस्टीस कायद्याअंतर्गत केस नोंदवली आहे. सध्या या प्रकरणाची सुनावणी होऊन उच्च न्यायालयाने पालकांविरुद्ध जिल्हा न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याला अंतरिम स्थगिती दिली आहे. ज्यावर येत्या काही दिवसांत सुनावणी होणार आहे. दोन्ही मुले सध्या त्यांच्या मावशीकडे राहत असल्याचे सांगण्यात येत आहे.