वेस्टइंडिजहून टी20 वर्ल्ड कप जिंकून परतल्यानंतर हिंदुस्थानचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली आणि अनुष्का लंडनमध्ये शिफ्ट होणार असल्याच्या बातम्यांना उधाण आले होते. आता तशीच काहीशी चर्चा हिंदुस्थानी क्रिकेटपटू रोहीत शर्मा याच्याबाबत समोर आली आहे. रोहित शर्मा हिंदुस्थान सोडून परदेशात शिफ्ट होणार असल्याची चर्चा सुरु आहे. यासंबंधिच्या अनेक बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र याबाबत कोणतेही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
सोशल मीडीयावर व्हायरल होणाऱ्या बातम्यानुसार रोहित शर्मा अमेरीकेत न्यूयॉर्कला स्थायिक होऊ शकतो. मात्र याबाबत अधिकृत कोणतीही माहिती नाही. रोहीतबाबत येणाऱ्या बातम्या तशास आहेत ज्या काही दिवसांपूर्वी विराट कोहलीबाबत होत्या. टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानी संघ देशात परतल्यानंतर विराट कोहली आपल्या कुटुंबासोबत लंडनला परतला होता. त्यानंतर सोशल मीडियावर विराट कोहली आता लंडनलाच स्थायिक होणार याबाबत सोशल मीडीयावर बातम्या व्हायरल झाल्या. विराट त्याच्या स्टारडम आयुष्यापासून दूरी ठेवण्यासाठी लंडनला स्थायिक होणार असे बोलले जात होते.
विराटची बातमी समोर आल्यानंतर विराट आणि अनुष्का यांचे लंडनमधील काही फोटो समोर आले होते. मात्र विराट लंडनला स्थायिक होणार याबाबत अधिकृत माहिती नाही. आता प्रश्न असा आहे की जर रोहित शर्मा न्यूयॉर्कला जाऊन सेटल होण्याचा विचार करत असेल तर त्याचे कारण काय असू शकते. याबाबत सध्या तरी स्पष्टपणे काहीही सांगता येणार नाही. अशा स्थितीत जोपर्यंत विराट आणि रोहितकडून या गोष्टी स्पष्ट होत नाहीत, तोपर्यंत हे दोन्ही क्रिकेटपटू हिंदुस्थानाबाहेर स्थायिक होणार आहेत की नाही हे निश्चितपणे सांगता येणार नाही.