>> अभिषेक भटपल्लीवार
चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य व्यवस्था पूर्णतः कोडमळली असल्याचे विदारक चित्र जिल्ह्यात निर्माण झाले आहे. चंद्रपूर शहरातील डॉक्टरच आजारी असल्याचे आढळून आल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. एक दोन नव्हे तब्बल पाच डॉक्टर डेंग्यू आजाराने ग्रासले आहे. यातील एक डॉक्टर गंभीर स्थितीत असल्याने त्यांना उपचारासाठी नागपूरला पाठविण्यात आले आहे.
चंद्रपुरातील कस्तुरबा मार्गांवर निवासी वैद्यकीय अधिकारी वसतीगृह आहे. या वसतीगृहातील पाच डॉक्टर, दोन नर्सिंगचे विद्यार्थी आणि चौकीदारला डेंगू झालाय. जिथे निवासी डॉक्टर राहतात त्या वस्ती गृहात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. दरम्यान या समस्या सोडवण्याची वारंवार मागणी निवासी डॉक्टरांनी केली. मात्र त्यांच्या मागणीकडे कानाडोळा करण्यात आला आहे.