Paris Olympics 2024 : विजयाचा उन्माद नडला; खेळाडूचा खांदाच निखळला; ‘अशी’ झाली अवस्था

फ्रान्सच्या पॅरीस शहरामध्ये ऑलिम्पिक स्पर्धा सुरू आहेत. 26 जुलैपासून या ऑलिम्पिकला सुरुवात झाली असून 11 ऑगस्टपर्यंत हा खेळाचा महाकुंभ सुरू राहणार आहे. जगभरातील शेकडो खेळाडू यात भाग घेण्यासाठी आणि हजारो प्रेक्षक खेळाडूंमधील द्वंद्व पाहण्यासाठी पॅरीसमध्ये दाखल झाले आहेत. दर चार वर्षांनी होणाऱ्या या स्पर्धेत पदक जिंकण्याचे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न होते. मात्र अनेकदा विजय साजरा करताना खेळाडूंना दुखापत होती. असाच प्रकार माल्डोवाच्या खेळाडूसोबत घडला आहे.

माल्डोवाचा ज्युडो खेळाडू आदिल ओस्मानोव याने कांस्यपदक जिंकले आहे. पुरुषांच्या 73 किलो वजनी गटामध्ये त्याने इटलीच्या मॅन्युअल लोम्बार्डो याचा पराभव करत ऑलिम्पिक पदक जिंकण्याचा कारनामा केला. या विजयानंतर आदिलने तुफान जल्लोश केला. मोठ्याने ओरडत तो गुडघ्यांवर बसला. मात्र विजयाचा हा उन्मात त्याच्या अंगाशी आला असून यादरम्यान त्याचा खांदा निखळला आहे.

Paris Olympics 2024 : मराठमोळ्या स्वप्निल कुसाळेनं इतिहास रचला; हिंदुस्थानला तिसरं पदक मिळवून दिलं

विजयाचा जल्लोष करताना आदिल ओस्मानोव गुडघ्यावर बसतो आणि खांद्याला पकडून वेदनेने कळवतो. बराच वेळ तो खांदा पकडून बसला होता. मात्र वेळीच त्याने स्वत:ला सावरले आणि अन्य पदक विजेत्या खेळाडूंसोबत त्यानेही पदक स्वीकारले. मात्र त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, पॅरीस ऑलिम्पिकआधी आपल्या खांद्याला दुखापत झाली होती आणि शस्त्रक्रिया करण्यात आली होती अशी माहिती आदिल ओस्मानोव याने दिली. सामन्याआधीही मला त्रास होत होता. माझ्यासोबत हे आधीही घडले आहे. त्यानंतरही मी पदक जिंकले. माझ्याकडे लढण्याशिवाय पर्यायच नव्हता, असेही तो म्हणाला.

आदिल ओस्मानोव याने आपले पदक दिवंगत वडिलांना अर्पण केले. त्यांनी ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे स्वप्न पाहिले होते. पण पैशाच्या तंगीमुळे त्यांना यश मिळाले नाही. मात्र त्यांचे स्वप्न होते की आपला मुलगा ऑलिम्पिकमध्ये खेळावा आणि त्याने पदक जिंकावे. आज त्यांचे स्वप्न पूर्ण झाले, असे तो म्हणाला.