Himachal Disaster: कुल्लू, मंडी आणि शिमलामध्ये ढगफुटी; दोघांचा मृत्यू, 50 जण बेपत्ता

हिमाचल प्रदेशमध्ये निसर्गाचा प्रकोप पाहायला मिळाला आहे. कुल्लू, मंडी आणि शिमला या तीन ठिकाणी ढगफुटी होऊन प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला असून 50 लोकं बेपत्ता आहेत. अनेक घरं वाहून गेली आहेत. अचानक पूर आल्याने रस्ते वाहून गेले आहेत. एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य वेगाने सुरु आहे.

ढगफुटीच्या घटनेनंतर मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी सचिवालयात तातडीची बैठक बोलावली आहे. त्याचबरोबर केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी हिमाचलला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. मंडी जिल्ह्याच्या द्रांग विधानसभा मतदारसंघातील धमचायन पंचायतीच्या राजवण गावातमध्ये मध्यरात्री ढगफुटी झाल्याने प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक घरं पाण्याच्या वेगाबरोबर वाहून गेली आहेत. यात 11 लोकं बेपत्ता आहेत. दोन मृतदेह सापडले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

उफायुक्त मंडी अपूर्व देवगण बचाव पथकाच्या मदतीने पोहोचले आहेत. प्रशासनाने रेस्क्यू अभियानासाठी हवाई दलाची मदत घेतली आहे. बुधवारी रात्री साधारण 12च्या सुमारास राजवन गावामध्ये ढगांच्या कडकडाटासह जोरदार आवाज झाला आणि बघता बघता चहूबाजूने पाणीच पाणी साचले. शिमला जिल्ह्याच्या रामपुर क्षेत्रातील समेजमध्ये ढगफुटी झाल्याने नुकसान झाले आहे. जि ज्यामध्ये 6 कुटुंबिय बेपत्ता झाली आहेत. यामध्ये 32 लोकं बेपत्ता आहेत. बेपत्ता लोकांचा शोध सुरु आहे. रामपुरच्या खनेरी रूग्णालयात डॉक्टरांचे पथक पोहोचले आहे. समोज खड्डमध्ये हायड्रो प्रकल्पाच्या बाजूला ढगफुटी झाली आहे. बेपत्ता लोकांची संख्या 32 झाली आहे. रेस्क्यू ऑपरेशन युद्धपातळीवर सुरु आहे.