जयपूरमध्ये दिल्लीची पुनरावृत्ती; बेसमेंटमध्ये पाणी भरल्याने 8 वर्षीय चिमुरड्यासह तिघांचा मृत्यू

राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे रस्ते, विमानतळ, रेल्वे स्थानक जलमय झाले असून पोलीस स्थानकासंह रुग्णालयांमध्येही पाणी घुसले आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेले असतानाच जयपूरमध्येही दिल्लीसारख्या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. शहरातील विश्वकर्म भागात बेसमेंटमझ्ये पाणी भरल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे. याच एका 4 वर्षीय चिमुरड्याचाही समावेश आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली व बेसमेंटमधील पाणी काढण्यास सुरुवात केली.

जयपूरमध्ये यंदा पहिल्यांदाच मुसळधार पाऊस कोसळला. पहिल्याच पावसामध्ये शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचले. दिल्लीतील जुन्या राजेंद्र भागातील कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये पाणी साचल्याने तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. त्याचप्रमाणे जयपूरच्या विश्वकर्मा भागातील एका बेसमेंटमध्ये पावसाचे पाणी भरले आणि तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन प्रौढांसह एका लहान मुलाचा समावेश आहे. सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे.

बचाव पथकाचे सदस्य असरार अहमद यांनी माध्यमांशी बोलताना या दुर्घटनेची माहिती दिली. बेसमेंटमध्ये साधारण 30 फूट पाणी भरले होते. गुरुवारी सकाळच्या सुमारास आम्हाला याची माहिती मिळाली. त्यानंतर आम्ही तात्काळ तिथे धाव घेतली. बेसमेंटमध्ये 7-8 वर्षाचा मुलगा आणि 19 वर्षांची मुलगी, तसेच शेजारच्या घरातील एक तरुण असे तिघे अडकले होते, अशी माहिती त्यांनी दिली.

दिल्लीची घटना काय?

दिल्लीतील जुन्या राजेंद्र नगर भागातील RAU’S IAS कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये लायब्ररी बनवण्यात आली होती. येथे विद्यार्थी अभ्यास करायचे. मात्र मुसळधार पावसामुळे कोचिंग सेंटरबाहेर पावसाचे पाणी साचले आणि दोन-तीन मिनिटात बेसमेंट भरले. यावेळी बेसमेंटमध्ये 30-35 विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी कतर होते. बेसमेंटमध्ये पाणी भरल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले. या दुर्घटनेत तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला.