Photo- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम!

 

शिवसेनेच्या मीरा भाईंदर संपर्क संघटक आणि दहिसर विधानसभा समन्वयक रोशनी कोरे-गायकवाड यांच्या माध्यमातून दहिसर पूर्वमधील अंगणवाडी सेविका, आरोग्यसेविका व मदतनीसांना छत्रीवाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला उमेश गायकवाड, संजय दुबे, नागेश शिरसाट, अशोक पवार, त्रंबक कांबळे, बाबूराव जगताप, दत्तात्रेय वाढाणे, संतोष कोंडापुरे, बापूसाहेब गजगे, मिलिंद गायकवाड, अमोल वारकरी उपस्थित होते

Displaying IMG-20240730-WA0029-darade.JPG

 

कांजूर शिवसेना शाखेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांच्या हस्ते खाऊवाटप करण्यात आले. सिद्धी जाधव, रवी महाडिक, मामी मंचेकर, श्वेता पावसकर, सुवर्णा चव्हाण, विजय तोडणकर, नानासाहेब पुंदे, लीना मांडलेकर, शुभांगी शिंदे, वंदना चव्हाण, कल्पना यादव, विजय वैद्य, मिलिंद खानविलकर यावेळी उपस्थित होते.

Displaying IMG-20240730-WA0025-darade.JPG

 

युवासेना कार्यकारिणी सदस्य सिद्धेश शिंदे यांनी किंग जॉर्ज मेमोरियल रुग्णालयातील वृद्धांना अन्नदान आणि हेल्थ किटचे वाटप केले. आमदार सुनील शिंदे यांनी यासाठी विशेष सहकार्य केले. अभिनेता आकाश दादलानी, अभिनेत्री गीतांजली गांगी यांच्यासह वरळी विधानसभेतील शिवसैनिक व युवासैनिक यावेळी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Displaying IMG-20240730-WA0036-darade.JPG

 

चांदिवली विभागात वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. माजी नगरसेवक सोमनाथ सांगळे, शाखासंघटक भारती पाटील, मनोज सांगळे, शाखाप्रमुख हिरालाल यादव यांच्यासह शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.

Displaying IMG-20240730-WA0022-darade.JPG

शिवसेना शाखा क्रमांक 130च्या वतीने जयंतीलाल शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तूंचे वाटप विभागप्रमुख सुरेश पाटील आणि घाटकोपर पश्चिमचे विधानसभा समन्वयक इमरान शेख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका सीमा सिंग, चंद्रपाल चंदेलिया, अवी राऊत, अशोक वंडेकर, रवी कोठावदे, राम पाल, नाना ताठेले, नंदा काळे, सुरेश करकेरा, किशोर बुगडे, हरेश यादव, महिंद्र भूते, गणेश परब, रमेश दोडके, कृष्णा पालव, क्लिफरट फर्नांडिस, हरीश बावधाने, धोंडीराम शेवाळे उपस्थित होते.

Displaying IMG-20240730-WA0023-Darade.JPG

 

शिवडी विधानसभेचे शिवसेना आमदार अजय चौधरी यांच्या वतीने शिवडी नाका येथील निवांत घेरडे चौक येथे लाडूवाटप करण्यात आले. माजी नगरसेवक सचिन पडवळ, शाखाप्रमुख हनुमंत हिंदोळे यांच्यासह शिवसेना शाखा क्रमांक 206 मधील पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Displaying IMG-20240730-WA0027-darade.JPG

 

शिवसेना चुनाभट्टी शाखा क्र. 170 व 171 च्या वतीने नरेशचंद्र कावले यांच्या सहकार्याने शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्यावाटप करण्यात आले. विभागप्रमुख डॉ. महेश पेडणेकर, शाखाप्रमुख मानसिंग कापसे, शाखा संघटक सोनाली म्हात्रे, उर्मिला केसरकर, केसरीनाथ म्हात्रे, देवेंद्र कुरटे आदी यावेळी उपस्थित होते.

Displaying IMG-20240730-WA0030-darade.JPG

 

शिवसेना शाखा क्र. 86, भैरवनाथ जनसेवा संस्था यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबीर व ज्येष्ठ नागरिकांना आधार कार्ड वाटप करण्यात आले. यावेळी आमदार ऋतुजा रमेश लटके, अंधेरी पूर्व विधानसभा संघटक प्रमोद सावंत, अरविंद शिंदे, बिपीन शिंदे, राजू सूर्यवंशी, सरिता रेवाळे, शुभम सूर्यवंशी यांच्यासह शिवसैनिक, कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Displaying IMG-20240729-WA0028-Bhagat.JPG