जगभरातून बातम्यांचा थोडक्यात आढावा

कराची खतरनाक शहरात अव्वल
फोर्ब्स अॅडवायजर लिस्टच्या अहवालानुसार पाकिस्तानातील कराची हे दुसऱया क्रमांकाचे धोकादायक शहर ठरले आहे. 100 पैकी 93.12 रेटिंगसह कराची पर्यटकांसाठी खतरनाक बनलंय. पर्ह्ब्स अॅडवायजर लिस्ट अनुसार तिथे गुन्हेगारी, हिंसाचार, दहशतवादी कारवाया आणि नैसर्गिक आपत्तींचा धोका अधिक आहे. महागाई आणि आर्थिक अडचणींशी झुंजणाऱया पाकिस्तानात लूटमार आणि गोळीबाराच्या घटना सर्रास घडतात. अनेक अहवालांतून कराची हे राहण्यालायक शहर नसल्याचे दिसून आलेय. व्हेनेझुएलातील काराकास हे यादीतील पहिल्या क्रमांकाचे धोकादायक शहर आहे. याअनुषंगाने काराकास शहराला 100 पैकी 100 रेटिंग मिळाले आहे. यांगून हे म्यानमारमधील तिसरे सर्वात धोकादायक शहर ठरले आहे.

लेबनानच्या सीमेवर तणाव
इस्रायलच्या ताब्यातील गोलन हाईट्स भागातील फुटबॉल मैदानावर 27 जुलै रोजी रॉकेट हल्ला झाला होता. या हल्ल्यात 13 मुलांचा मृत्यू झाला. हल्ल्यामागे लेबनानमधील हिजबुल्लाह संघटनेचा हात असल्याचे इस्रायल आणि अमेरिकेचे म्हणणे आहे. या घटनेनंतर लेबनानच्या सीमेवर तणाव वाढला आहे. इस्रायलने हल्ल्याच्या बदल्याची घोषणा करत जोरदार प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे. इस्रायलने 28 आणि 29 जुलै रोजी हिजबुल्लाहच्या काही ठिकाणांवर हल्ले चढवले.

प्रियकरासाठी दोन मुलांची आई हिंदुस्थानात आली
पाकिस्तानातील दोन मुलांची आई असलेली एक महिला प्रियकरासाठी थेट हिंदुस्थानात दाखल झाली. तिने हिंदुस्थानात येताच राजस्थानमधील तरुणाशी विवाह केला आहे. मेहविश असे या महिलेचे नाव आहे. ती लाहोरची रहिवाशी आहे. तिला 12 आणि 7 वर्षांची दोन मुले आहेत. मेहविश टूरिस्ट व्हिसावर 45 दिवसांसाठी आली.

आयफोन नव्हे, ही तर लग्नपत्रिका
सोशल मीडियावर एका आगळ्य़ावेगळ्या लग्नपत्रिकेने लक्ष वेधून घेतलंय. लग्नपत्रिका चक्क आयफोनच्या आकारात आहे. पहिल्या दृष्टिक्षेपात ही लग्नपत्रिका अगदी फोनसारखी दिसते. त्यामुळे तुम्हाला आयफोनची भेट मिळालेय असे वाटून फसगत होऊ शकते. लक्ष्मण वेडींग कार्ड नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या हटके लग्नपत्रिकेचा व्हिडियो शेअर करण्यात आलाय. ही लग्नपत्रिका हुबेहुब आयपह्नसारखी दिसते. त्यामध्ये बुकलेट स्टाईल लेआउट दिसतोय. लग्नपत्रिकेमध्ये एपूण तीन पाने दिसतात. बॅक कव्हरवर एक शानदार कॅमेरा डिझाईन केलेले आहे. त्याला 3डी इफेक्ट देण्यात आले आहे. अशा प्रकारे कल्पकतेने लग्नपत्रिका तयार केली आहे.

पाकिस्तानी एअर होस्टेसची तस्करी
पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स (पीआयए) च्या एअर होस्टेसला लाहोरच्या अल्लामा इक्बाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशी चलनाची तस्करी करताना पकडण्यात आले. ही रक्कम तब्बल एक कोटी रुपयांची होती. एअर होस्टेसने तिच्या सॉक्समध्ये बरेच अमेरिकन डॉलर्स आणि सौदी रियाल लपवले होते. या एअर हॉस्टेसचा तस्करी करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एअर होस्टेसकडून 1,40,000 सौदी रियाल जप्त करण्यात आले आहेत. त्याची पाकिस्तानी रुपयात किंमत सुमारे 1 कोटी 4 लाख रुपये आहे. एअर होस्टेसला तस्करी केल्याप्रकरणी तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच तिला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.

ओलाचा मॅप वादात सापडला
गुगल मॅपसाठी कोटय़वधी रुपये मोजावे लागतात म्हणून ओला पंपनीने स्वतःचा मॅप लाँच केला. परंतु आता हाच मॅप वादात सापडला. ‘मॅप माय इंडिया’ने आपला डेटा चोरल्याचा आरोप ‘ओला’ कंपनीवर केला. याप्रकरणी ओलाला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
– मॅप माय इंडियाची मूळ कंपनी सीई इन्पह् सिस्टिमने ओलाला ही नोटीस पाठवली आहे. यात बेकायदेशीर डेटा कॉपी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

सुंदर पिचाईंचा पत्नीसह गौरव
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि त्यांची पत्नी अंजली पिचाई यांना इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी खरगपूरकडून
प्रतिष्ठत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सॅन फ्रान्सिस्को येथे एका विशेष कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. सुंदर पिचाई यांना डॉक्टर ऑफ सायन्स पुरस्कार, तर अंजली पिचाई यांना रसायन अभियांत्रिकी क्षेत्रातील योगदानाबद्दल विशेष माजी विद्यार्थी पुरस्काराने सन्मानित केले.

ब्रिटनमध्ये चिल्ड्रन क्लबमध्ये हल्ला; एक ठार, आठ जखमी
यूकेच्या साऊथपोर्ट शहरातील मुलांच्या क्लबमध्ये सामूहिक हल्ल्यात एक जण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना घडली. हल्ला केलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. सामूहिक हल्ला करणारा आरोपी 17 वर्षांचा आहे. हल्लेखोराने हा हल्ला का केला याचे कारण समोर आले नाही.

मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी शाहरूख अमेरिकेला जाणार
बॉलीवूडचा बादशाह शाहरूख खानला मोतीबिंदू झाला असून डोळ्याच्या उपचारासाठी शाहरूख खान अमेरिकेला जाणार आहे. शाहरुखला डोन्ही डोळ्यात मोतीबिंदू झाला असल्याने त्रास होत आहे, असे बोलले जात आहे. परंतु, यासंबंधी शाहरुख किंवा त्याच्या टिमकडून यासंबंधी कोणतीही माहिती देण्यात आली नाही.