दुसऱ्यांदा कार खरेदी करायची असेल तर पेट्रोल किंवा डिझेलची कार खरेदी करायला प्राधान्य देऊ असे ईव्ही खरेदीदारांनी सांगितले.
देशभरात इलेक्ट्रिक गाडय़ांचा बोलबाला सुरू आहे. अनेक पंपन्या इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) लाँच करत आहेत. परंतु, इलेक्ट्रिक वाहनांसंबंधी एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणारे 50 टक्क्यांहून अधिक गाडय़ांचे मालक ईव्ही गाडय़ांबाबत समाधानी नाहीत. गाडी खरेदी करण्यापूर्वी ते जास्त उत्सुक होते. परंतु गाडी खरेदी केल्यानंतर ते गाडीबाबत असमाधानी आहेत. इलेक्ट्रिक गाडय़ांचा परफॉर्म्स पाहून ते आता पेट्रोल आणि डिझेल गाडय़ांकडे वळावे का? अशा विचारात आहेत असेही समोर आले आहे. पार्प प्लसने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणानुसार, ईव्ही वाहन खरेदी केल्यानंतर अनेक जण आनंदी नाहीत. यासंबंधीचा एक अहवाल प्रसिद्ध झाला असून या अहवालात हिंदुस्थानातील इलेक्ट्रिक वाहन मालकांमध्ये आपल्या गाडय़ांबद्दल असंतोष दिसून आला आहे. या सर्वेक्षणात दिल्ली-एनसीआर, मुंबई आणि बेंगळुरूमधील 500 ईव्ही कार मालकांशी संवाद साधला आहे. सर्वेक्षण केलेल्या ईव्ही मालकांपैकी 51 टक्के मालकांनी सांगितले की, जर यानंतर कार खरेदी करायची असेल तर पेट्रोल किंवा डिझेलची कारला प्राधान्य दिले जाईल, असे सांगितले. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (फाडा)च्या आकडेवारीनुसार, 2023-24 या आर्थिक वर्षात हिंदुस्थानात जवळपास 91 हजार इलेक्ट्रिक प्रवासी वाहने विकली गेली आहे.
चार्जिंगची समस्या भेडसावतेय
हिंदुस्थानात ज्याप्रमाणे ठिकठिकाणी पेट्रोल पंप दिसतात. त्याच्या तुलनेत ईव्ही चार्जिंगची सुविधा अद्याप दिसत नाही. ईलेक्ट्रिक कार खरेदी करण्यासाठी शोरूमला जाणारा खरेदीदार सर्वात आधी चार्जिंगसंबंधी विचारणा करतो. तसेच इलेक्ट्रिक कारने लांबचा प्रवास करण्यासाठीही अनेकांना भीती वाटते.
ईव्ही वाहनांचा देखभाल खर्च परवडेना
या सर्वेक्षणात 88 टक्के ईव्ही मालकांनी इलेक्ट्रिक वाहन
चार्ंजगशी संबंधित चिंता ही प्राथमिक आहे, असे सांगितले. चार्ंजगची चिंता ड्रायव्हिंग रेंजच्या चिंतेपेक्षा जास्त आहे. ईव्ही वाहनांचा देखभाल खर्च हासुद्धा चिंतेचा विषय आहे. वाहनांची काही दुरुस्ती करायची असल्यास पेट्रोल आणि डिझेल वाहनांच्या तुलनेत जास्त खर्च येतो. वाहनांत जी बॅटरी दिली आहे तिच्या गुणवत्तेवर अनेक खरेदीदार समाधानी नाहीत. बॅटरीची किंमत ईव्हीच्या किंमतीच्या 30 टक्के आहे.
किंमती खिशाला परवडण्याजोग्या नाहीत
इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती डिझेल आणि पेट्रोल कारच्या तुलनेत जरा जास्तच महाग आहेत. देशातील कंपनीची आणि चांगली कार खरेदी करायची असेल तर त्यासाठी कमीत कमी 10 लाख ते 15 लाख रुपये मोजावे लागतात. 7 सीटरसाठी 17 लाखांहून अधिक किंमत मोजावी लागत आहे.