चेन्नईमध्ये मोठ्या बहिणीने आपल्या लहान बहिणीचा सौदा केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मोठी बहीण आणि तिच्या सासूने मिळून लहान बहिणीला जबरदस्तीने देहविक्रीच्या व्यावसायात ढकलले आहे. बहिणीच्या सासूच्या माध्यमातून ग्राहक पीडितेला आपल्या वासनेची शिकार बनवत होते. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत आठ जणांना अटक केली आहे. त्यात तीन महिला, एक पुजारी, केबल टेक्निशियन आणि दुकानदार यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला चेमनेचेरी येथील रहिवासी आहे. आपण आपल्या बहिणीच्या घरीच सुरक्षित राहू शकू, अशा आशेने ती विवाहित बहिणीच्या पडुवनचेरी येथील घरी शिक्षणासाठी आली होती. मात्र तिच्या बहिणीच्या मनात काही वेगळेच होते. आपली लहान बहीण आपल्याकडे राहायला आल्याने तिने आणि तिच्या सासूने मिळून तिला देहविक्री करण्यास भाग पाडले. यानंतर ते नराधम पीडितेला केके नगर आणि चेंगलपट्टूसह अनेक ठिकाणी घेऊन गेले. दरम्यान, चेंगलपट्टू बाल कल्याण समितीला ही माहिती मिळाली. समितीने याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर महिला पोलिसांच्या पथकाने छापा टाकून पीडितेची सुटका केली.
पोलिस उपायुक्त गौतम गोयल यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथक स्थापन करून सखोल तपास करण्याचे आदेश दिले. पोलिस तपासात सेक्स रॅकेट उघड झाले. पोलिसांनी प्रथम पीडितेची बहीण, सासू आणि तीन पुरुषांसह सहा जणांना अटक केली. आरोपींमध्ये मंदिराच्या पुजाऱ्याचाही समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांनी गेल्या शुक्रवारी आणखी दोन आरोपींना अटक केली.