ऑगस्ट 2024 मध्ये भरपूर सुट्टय़ा आहेत. रक्षाबंधनाला जोडून मोठा विपेंड आल्याने देशातील प्रमुख हवाई मार्गावरील तिकीट दरात 46 टक्के वाढ झाली आहे. 15 ऑगस्ट रोजी सुट्टी आहे. 17 आणि 18 ऑगस्ट रोजी शनिवार- रविवार असल्याने सुट्टी असेल. त्यानंतर सोमवारी रक्षाबंधन आहे. या दीर्घ सुट्टय़ांमुळे 14 ते 20 ऑगस्ट दरम्यान बंगळुरू ते मुंबई मार्गावरील विमान भाडे सरासरी 3969 रुपये झाले आहे.