रखडलेल्या फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आज फेरीवाला समिती निवडणूक जाहीर करण्यात आली. त्यानुसार, काढण्यात आलेल्या महिला आरक्षण सोडतीत महिलांसाठी एकूण 24 जागांवर आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. 5 ऑगस्टपासून निवडणूक प्रक्रिया सुरू होणार असून 29 ऑगस्टला मतदान आणि निकाल जाहीर केला जाणार आहे.
संपूर्ण मुंबई महानगरासाठी शिखर समितीसह सात परिमंडळाच्या प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण आठ समित्यांमध्ये महिला आरक्षण निश्चितीसाठी ही सोडत आयोजित करण्यात आली होती. प्रत्येक समितीमध्ये आठ सदस्य असतील. म्हणजेच एकूण 64 सदस्य संख्या असलेल्या या समित्यांमध्ये खुला प्रवर्गातील 8, दिव्यांग 2, अल्पसंख्याक 5, इतर मागासवर्ग 4, अनुसूचित जाती 3, अनुसूचित जमाती प्रवर्गातील 2 जागा याप्रमाणे एकूण 24 जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. पेंद्र शासनाच्या पथविव्रेता (उपजीविका संरक्षण व पथविक्री विनियमन) अधिनियम-2014 अंतर्गत महाराष्ट्र पथविव्रेता (उपजीविका संरक्षण व पथविक्री विनियमन) अधिनियम -2016 मधील तरतुदींच्या अनुषंगाने नगर परिषद प्रशासन संचालनालयाचे आयुक्त तथा संचालक तसेच समन्वयन अधिकारी (फेरीवाला धोरण) यांच्या निर्देशांनुसार, नगरपथ विव्रेता समिती गठीत करण्यात येणार आहे.