पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानच्या झोळीत पहिले पदक टाकून नेमबाजीतील पदकाचा 12 वर्षांचा दुष्काळ संपविणारी मनू भाकर आणि तिचा साथीदार सरबजोत सिंह उद्या कांस्यपदकावर ‘नेम’ धरणार आहेत. मनू-सरबजोत ही जोडी 10 मीटर एअर पिस्टलच्या मिश्र सांघिक प्रकारात देशाला पदक जिंकून देण्यासाठी सर्वस्व पणाला लावतील.
मनू-सरबजोत ही जोडी मंगळवारी कांस्यपदकाच्या लढतीत दक्षिण कोरियाच्या ओह ये जिन व ली वोन्हो या जोडीचे आव्हान असेल. पात्रता फेरीत मनू-सरबजोत जोडी 580 गुणांसह तिसऱ्या स्थानी, तर कोरियन जोडी 579 गुणांसह चौथ्या स्थानी राहिली. मिश्र सांघिक प्रकारात चार संघ फायनलसाठी पात्र ठरत असतात.