
जिल्हा शल्य चिकित्सकांनी साईं हॉस्पिटलमध्ये पाठवलेल्या डमी पेशंट कडून गर्भपातासाठी 22 हजार रूपयांचे शुल्क आकारण्यात आले होते. त्यापैकी डमी पेशंटने 15 हजार रूपये ॲडव्हान्स भरले होते, असे सांगताना साई हॉस्पिटलवरील कारवाई गोपनीयपणे केल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.भास्कर जगताप यांनी दिली.
साई हॉस्पिटलवरील कारवाईबाबत माहिती देताना म्हणाले की, साईं हॉस्पिटलमध्ये एक डमी पेशंट पाठवला. त्या पेशंटने हॉस्पिटलमध्ये जाऊन मला आधी एक मुल आहे. अजून लगेच दुसरं मुल नको त्यामुळे गर्भपात करायचा आहे. त्या महिलेला संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये बोलावलं. त्याचवेळी पोलिसांसह आम्ही साई हॉस्पिटलवर धाड टाकली. त्यावेळी ऑपरेशन थिएटरमध्ये गर्भपात करण्याचे साहित्य आणि गोळ्या सापडल्या अशी माहिती डॉ.जगताप यांनी दिली. साई हॉस्पिटलचे डॉ.अनंत नारायण शिगवण यांच्यावर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या सर्व प्रकारानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.