मध्य प्रदेशात भीषण अपघात, ट्रकने ट्रॅक्टर ट्रॉलीला दिलेल्या धडकेत 4 भाविकांचा मृत्यू; 12 हून अधिक जखमी

मध्य प्रदेशातील मुरेना जिल्ह्यात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे, येथे एका भरधाव ट्रकने ट्रॅक्टर ट्रॉलीला दिलेल्या जबरदस्त धडकेत ट्रॅक्टर ट्रॉलीमधील चार भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर 12हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले आहे. तर दोघांना ग्वाल्हेर येथे हलविण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात राष्ट्रीय महामार्ग 44 वर देवरी गावात घडला आहे. भाविक एका ट्रॅक्टरमधून खडियाहार गावातून उत्तर प्रदेशातील गंगा घाटावर कांवड यात्रेसाठी जात होते. दरम्यान देवरी गावाजवळ भरधाव ट्रकने भाविकांनी भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला जबरदस्त धडक दिली. ही टक्कर इतकी भीषण होती की त्यात दोन भाविकांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघांचा रूग्णालयात नेताना मृत्यू झाला. तर 12 हून अधिक भाविक जखमी आहेत.

सर्व जखमींना स्थानिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. तर यापैकी दोन जण गंभीर जखमी असून त्यांना ग्वाल्हेर येथे हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी गुन्हा दाखल करत पुढील कारवाई सुरु आहे.