Nagpur News: नग्नावस्थेत रस्त्यावर धावले; नागपुरातील जोडप्याचा अश्लील व्हिडीओ व्हायरल

नागपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून अनेक विचित्र घटना घडत आहेत. काहीच दिवसांपूर्वी एका जोडप्याचा कारमध्ये अश्लिल चाळे करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर एका कुख्यात गुंडाचा आपल्या प्रेयसीसोबत दुचाकीवर अश्लिल कृत्य करताना व्हिडीओ व्हायरल झाला होता. दरम्यान आता पुन्हा एकदा अश्लिलतेची सीमा पार करणारी एक घटना नागपूरात धडलीय. एक दाम्पत्य नग्नावस्थेत रस्त्यावर फिरत होते. सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून स्थानिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

सदर घटना 27 जुलै रोजी नागपुरमधील लक्ष्मीनगर चौक ते माटे चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली आहे. एक दाम्पत्य नग्न अवस्थेत रसत्यावर चालतानाचा व्हिडीओ व्हायरल होतोय. आधी पती नग्न अवस्थेत घराबाहेर पडला. हे पाहून पत्नी देखील तशीत नग्न अवस्थेत पतीच्या मागे धावत निघाली. दरम्यान नग्नावस्थेतील या दाम्पत्याचा हा व्हिडीओ दुचाकीस्वारांनी रेकॉर्ड केला आहे. या व्हिडीओमधील दाम्पत्य मानोरुग्ण असल्याचं प्राथमिक माहिती मिळाली आहे.

दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे पोलिसांनी या घटनेची तत्काळ दखल घेतली. बजाज नगर पोलिसांनी या दाम्पत्याचा शोध घेतला असून त्यांना तातडीने पोलीस ठाण्यात बोलावले. यादरम्यान त्यांच्या कुटुंबियांकडून ते दोघे पती-पत्नी मानसिक रूग्ण असल्याचे समजले. त्य़ामुळे या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केले नसून त्या दाम्पत्यावर योग्य ते उपचार करण्याची माहिती पोलिसांनी कुटुंबीयांना दिली आहे.

Nagpur News : कारच्या स्टिअरिंगवर बसून जोडप्याचे अश्लील चाळे; व्हायरल व्हिडीओनंतर पोलिसांची कारवाई