हिंदुस्थानचा अनुभवी टेबल टेनिसपटू अचंथा शरथ कमल पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुष एकेरीच्या लढतीत सलामीलाच गारद झाला. 42 वर्षीय शरथ कमलला स्लोव्हेनियाच्या डेनी कोझूलने 4-2 फरकाने हरविले. शरथने पहिला गेम जिंकून झकास सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर त्याने लागोपाठ तीन गेम गमावले. पाचवा गेम जिंकून हिंदुस्थानी खेळाडूने लढतीत पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र चुरशीचा सहावा गेम गमावल्यानंतर शरथ कमलचे आव्हान संपुष्टात आले.