हिंदुस्थानची स्टार टेबल टेनिसपटू मनिका बत्रा हिने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विजयी सलामी दिली. तिने ब्रिटनच्या ऍना हर्सीवर 4-1 फरकाने मात केली.
टेबल टेनिसच्या राऊंड ऑफ 64मधून राऊंड ऑफ 32मध्ये पोहोचणारी मनिका बत्रा ही दुसरी हिंदुस्थानी महिला खेळाडू ठरली आहे. तिच्या आधी, श्रीजा अकुला हिने विजय मिळवत पुढची फेरी गाठली होती. मनिका बत्राने ऍना हर्सीवर 12-10, 11-8, 12-10, 9-11, 11-5 असा विजय मिळविला. हर्सीला केवळ चौथाच गेम जिंकता आला.