मागील आठवड्यात शिक्षक बँकेच्या झालेल्या पदाधिकारी निवडणुकीत ज्या गद्दार संचालकांनी वेगळी भूमिका घेत गुरुमाऊली मंडळ व शिक्षक संघाचा आदेश डावलला. तसेच शिस्तपालन समितीपुढे आपले म्हणणे न मांडल्यामुळे शिक्षक संघ व गुरुमाऊली मंडळाचे अकरा संचालक व त्यांना फुस लावणारे सहा नेते यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतल्याचे शिस्तपालन समितीचे अध्यक्ष दत्ता पाटील कुलट यांनी जाहीर केला.
विकास मंडळात झालेल्या आमसभेत जिल्हाभरातील गुरुमाऊली सदिच्छा प्रेमींची मनोगते जाणून घेतल्यानंतर त्यांनी हा निर्णय जाहीर केला. अध्यक्षस्थानी बँकेचे माजी चेअरमन संदीप मोटे शिक्षक नेते बापूसाहेब तांबे होते. जिल्हा भरातून आलेल्या संघ व गुरुमाऊलीच्या सर्वसामान्य सभासदांनी या घडामोडीवर तीव्र भाषेत आपल्या भावना व्यक्त केल्या. तातडीने या संचालकांना व त्यांना फूस लावणाऱ्या उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष राजकुमार साळवे ,गुरुमाऊली मंडळाचे अध्यक्ष सुरेश निवडूंगे ,माजी चेअरमन साहेबराव अनाप,माजी व्हाइस चेअरमन अर्जुन शिरसाट,बाबा खरात यांची हकालपट्टी करण्यात आली. यावेळी माजी चेअरमन संदीप मोटे, संतोष दुसूंगे,संतोष दळे, जिल्हा संघाचे अध्यक्ष बबन दादा गाडेकर यांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी गोकुळ कळमकर,शरद सुद्रिक,नवनाथ तोडमल,प्रदीप दळवी, सुयोग पवार बाबासाहेब आव्हाड,भास्कर कराळे, रामेश्वर चोपडे,निर्गुणा बांगर,महेश भनभणे,बाळासाहेब तापकीर,गोरक्षनाथ विटनोर,कैलास सहाने, सुखदेव आरोळे,पांडुरंग काळे, चंद्रकांत गट, रविकिरण साळवे,विठ्ठल काकडे, धुमाळ महाराज,श्री कारभारी बाबर, मुकुंद कारले, सचिन शिंदे, किरण निंबाळकर,श्रीमती वनिता सूंबे, सुवर्णा,राठोड,जितू रहाटे,जयेश गायकवांड,,स्वाती काळे,मिनिनाथ देवकर,बाळू चाबुकस्वार, किरण निंबाळकर,अरुण सूर्यवंशी,दादा चव्हाण,केशव कोल्हे, बजरंग गोडसे, योगेश खेडकर,संदीप पोखरकर, नवनाथ दिवटे, सचिन नाबगे, राजेंद्र ठोकळ संतोष आंबेकर विजय नरवडे मुकुंद सातपुते आदिनाथ सातपुते,संदीप ठानगे,सुखदेव आरोले, चंद्रकांत गट, यांच्यासह जिल्हाभरातील प्रमुख कार्यकर्ते,पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी गुरुमाऊली सदिच्छा मंडळाच्या प्रभारी जिल्हाध्यक्षपदी श्री राजू कुदनर यांची निवड करण्यात आली. प्रास्ताविक नारायण पिसे तर सूत्रसंचालन श्री प्रकाश नांगरे यांनी केले.