तर तुम्हाला पुन्हा कधीच मतदान करावं लागणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांचे धक्कादायक विधान

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रचाराच्यावेळी बोलताना जर अमेरिकेतील ख्रिश्चनांनी मला मतदान केले तर त्यांना पुन्हा कधीही मतदान करावे लागणार नाही, असे धक्कादायक विधान केले आहे. त्यावरून सध्या विरोधीपक्षाने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. ”देशातील लोकशाही धोक्यात असल्याचा हा पुरावा’, असल्याची टीका डेमोक्रेटीक पक्षाकडून करण्यात आली आहे.

”चार महिन्यांनी या नोव्हेंबर महिन्यात ख्रिश्चनांना घराबाहेर पडून मतदान करावे लागेल. त्यानंतर मी पुढील 4 वर्षात सर्व काही ठीक करेन. 4 वर्षानंतर त्यांना पुन्हा मतदानासाठी कधीच यावे लागणार नाही. सर्व काही चांगले होईल.” ट्रम्प म्हणाले की मी स्वतः ख्रिश्चन धर्मावर विश्वास ठेवतो आणि सर्व ख्रिश्चनांवर खूप प्रेम करतो”, असे आवाहन ट्रम्प यांनी ख्रिश्चन धर्मियांना केले आहे.

”ट्रम्प यांचे हे वक्तव्य म्हणजे देशाच्या या निवडणुकीत लोकशाही धोक्यात असल्याचा हा पुरावा आहे. जर आम्हाला ती वाचवायची असेल, तर हुकूमशाहीच्या विरोधात मतदान करावे लागेल. जर ट्रम्प निवडून आले, तर देशाची निवडणूक प्रक्रियाच संपवणार, अशी भीती डेमोक्रॅटिक पक्षाकडून निवडणूक लढवणारे ॲडम शिफ यांनी व्यक्त केली आहे.