Latur news : ओव्हर टेकच्या नादात उभ्या ट्रॅक्टरला नेक्सनची धडक; दोन जण जागीच ठार, एक गंभीर

लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील फत्तेपुरपाटी जवळ उभ्या असलेल्या एका ट्रॅक्टरला नेक्सन कारने ओव्हरटेक करताना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीमुसार, शुक्रवारी सायंकाळ 8:30 वाजण्याच्या सुमारास औसा ते किल्लारी या राष्ट्रीय महामार्गावर फत्तेपूर पाटीच्या जवळ हा अपघात झाला. औसा येथून किल्लारीकडे जात असताना फत्तेपूर पाठीच्या जवळ थांबलेल्या उभ्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करताना नेक्सन कार (क्रमांक MH 24/ BR 5925) धडकली. यामध्ये कारच्या डाव्या बाजूच्या भागाचा अक्षरश: चेंदामेंदा झाला.

दरम्यान, या कारमधून प्रवास करणारे दिनेश दंडगुले (रा. किल्लारी) आणि सचिन माने कुसळकर (रा. माकणी) जागीच ठार झाले आहेत. तर यल्लाप्पा पांढरे हे गंभीर जखमी झालेले असून त्यांना पुढील उपचारासाठी लातूरला हलवण्यात आले आहे. घटनास्थळी औसा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार रामकिशन गुट्टे, पोलीस हवालदार मोतीराम घुले आणि पोलीस कॉन्स्टेबल गोविंद पाटील आणि चालक मगर यांनी दाखल होत पंचनामा केला.