साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 28 जुलै ते शनिवार 3 ऑगस्ट 2024

>> नीलिमा प्रधान

मेष – कायदा मोडू नका

मेषेच्या पंचमेषात बुध, चंद्र-शुक्र लाभयोग. मधुर वाणी, चातुर्याचे बोल यावर यश मिळवता येईल. क्षेत्र कोणतेही असो, अहंकाराचा दर्प येता नये. नोकरीत सावधपणे काम करा. धंद्यात लाभ होईल. कायदा मोडू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत दबाव राहील. जुना वाद काढला जाईल, वरिष्ठांना दुखवू नका. स्पर्धा कठीण आहे.

शुभ दिन : 30, 31

वृषभ – स्पर्धेत टिकून रहा 

वृषभेच्या सुखस्थानात शुक्र, सूर्य-चंद्र लाभयोग. प्रवासात घाई नको. नोकरीत कठोर बोलणे टाळा. वर्चस्व राहील. धंद्यात वसुली करा. नवे काम मिळवा.  नवीन परिचयात कोणतीही घाई नको. राजकीय – सामाजिक क्षेत्रांत उत्साह – आत्मविश्वास वाढेल, कठीण कामे करून घ्या. स्पर्धेत टिकता येईल. घरगुती कामे होतील.

शुभ दिन : 30, 31

मिथुन – रागावर ताबा ठेवा

मिथुनेच्या पराक्रमात शुक्र, चंद्र-बुध लाभयोग. आळसाने कामे रेंगाळतील. मेहनत घ्या. रागावर ताबा ठेवा. वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवा. नोकरीच्या कामात प्रगती होईल. सौम्य धोरण ठेवा. धंद्यात अरेरावी नको. लाभ वाढेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांतील कठीण कामे करा, नवीन ओळख फायद्याची ठरेल. सल्ला उपयुक्त ठरेल.

शुभ दिन : 28, 31

कर्क – कामे मार्गी लावा

कर्केच्या धनेषात शुक्र, चंद्र-गुरू युती. अनेक कामे मार्गी लावता येतील. क्षुल्लक अडचणींवर मात कराल. तुमच्या क्षेत्रातील गैरसमज दूर सारून नव्या विचाराने पुढे जाता येईल. नोकरीत कामाचे कौतुक होईल. धंद्यात जम बसेल, नवा उद्योग समोर येईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत जम बसवा. अर्धवट योजना पूर्ण करा. पद-प्रतिष्ठा, लोकप्रियता मिळेल.

शुभ दिन : 28, 30

सिंह – अहंकार दूर ठेवा

स्वराशीत शुक्र, चंद्र-गुरू युती. थोरामोठय़ांचे सहकार्य मिळेलच असे समजू नका. योग्य सल्ला मिळवता येईल. अहंकार नको, कायदा पाळा. नोकरीत कामात चूक नको, वरिष्ठांना दुखवू नका. धंद्यात नियम मोडू नका. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत नम्रता ठेवल्यास लोकप्रियता मिळेल. नवीन परिचय होतील. आर्थिक साहाय्य मिळेल.

शुभ दिन : 31, 1

कन्या – नोकरीत प्रभाव वाढेल

कन्येच्या व्ययेषात शुक्र, सूर्य-चंद्र लाभयोग. तत्त्वाला धरून बोलणे असले तरी खरे बोलणे कुणालाच पटत नाही. वाद ताणू नका. नोकरीत प्रभाव टिकवता येईल. धंद्यातील चर्चा सौम्य भाषेत करा. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत परखड मतप्रदर्शन करताना विचार करा. वरिष्ठांचे सहकार्य राहील. सहकारी नेते यांची मदत मिळणार नाही. कुटुंबात नाराजी राहील.

शुभ दिन : 29, 30

तूळ – प्रवासात घाई नको

तूळेच्या एकादशात शुक्र, सूर्य-चंद्र लाभयोग. स्वत:ची कामे करून घ्या. वादग्रस्त प्रश्न विचार करून हाताळा. प्रवासात घाई नको. नोकरीत कामाचे कौतुक होईल. योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत गुप्त कारवायांना कमी समजू नका. वरिष्ठांचे सहाय्य मिळेल. नहवन परिचय होतील. ज्ञानात भर पडेल. स्पर्धेत टिकून रहा.

शुभ दिन : 28, 29

वृश्चिक – सौम्य धोरण ठेवा

वृश्चिकेच्या भाग्येषात शुक्र, सूर्य-चंद्र लाभयोग. दगदग वाढेल. राग आणणारे वक्तव्य ऐकावे लागेल. सौम्य धोरण उपयुक्त ठरेल. नोकरीत नम्रता ठेवा, धंद्यास नवा पर्याय शोधाल. नवे काम मिळेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत बेसावध राहू नका. चुकीचे वक्तव्य टाळा. प्रतिष्ठा जपता येईल. कुठेही उतावळेपणा करू नका.

शुभ दिन : 30, 31

धनु – दूरदृष्टिकोन ठेवा

धनुच्या भाग्येषात शुक्र, चंद्र-बुध लाभयोग. गुप्त कारवायांना समजून घ्या. रागात कोणताही निर्णय घेऊ नका. दूरदृष्टिकोन ठेवा. गैरसमज वाएt देऊ नका. नोकरी टिकवा. धंद्यात सौम्य धोरण ठेवा. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत वरिष्ठांचा दबाव वाढेल. मनस्ताप होईल. कौटुंबिक प्रश्न किचकट वाटेल. प्रकृतीची काळजी घ्या.

शुभ दिन : 31, 1

मकर – सावध रहा

मकरेच्या अष्टमेषात शुक्र, सूर्य-चंद्र लाभयोग. शाब्दिक, फसवे आश्वासन गृहित धरू नका. नकळत तुम्हाला कमी समजण्याचा प्रयत्न होईल. घरगुती वातावरण सांभाळावे लाभेल. नोकरीतील किचकट कामे पूर्ण करा. धंद्यात सहकार्य मिळाले तरी चिंता राहील. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत वरिष्ठांची भेट घेता येईल, मनोगत सावधपणे व्यक्त करा.

शुभ दिन : 29, 30

कुंभ – महत्त्वाची कामे करा

कुंभेच्या सप्तमेषात शुक्र, चंद्र-बुध लाभयोग. महत्त्वाची कामे सप्ताहाच्या सुरुवातीला करून घ्या. राग, अहंकार ठेवल्यास मनस्ताप वाढेल, वैर वाढेल, गैरसमज होईल. नोकरीत सतर्क रहा. वरिष्ठांची मर्जी राखा. धंद्यात नुकसान टाळा. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत आरोप, टीका सहन करून कामे करावी लागतील. कायदा पाळा.

शुभ दिन : 28, 29

मीन – सौम्य धोरण ठेवा

मीनेच्या षष्ठेषात शुक्र, सूर्य-चंद्र लाभयोग. किचकट कामे करून घ्या. कठोर बोलणे अडचणी आणतील. नोकरीतील कामात यश मिळेल. धंद्यात आश्वासन देऊ नका. राजकीय – सामाजिक क्षेत्रांत थोरामोठय़ांची भेट- चर्चा यात यश मिळेल. व्यवहारात सावध रहा. अधिकारात वाढ होईल. जबाबदारी मिळेल. स्पर्धेत प्रगती कराल.

शुभ दिन : 28, 29