महिला आशिया चषक स्पर्धा; हिंदुस्थानची दणक्यात अंतिम सामन्यात एण्ट्री, आठव्यांदा किताब पटकावण्यासाठी सज्ज

श्रीलंकेत सुरू असलेल्या महिलांच्या आशिया चषक स्पर्धेमध्ये हिंदुस्थानी महिला संघाचा दबदबा कायम आहे. हिंदुस्थानी महिला संघाने आज (दि. 26) उपांत्या सामन्यात बांगलादेशचा 10 गडी राखून दारुण पराभव करत अंतिम सामन्यात धडक मारली आहे. रेणुका सिंग, राधा यादव यांची भेदक गोलंदाजी, त्यानंतर स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांच्या तुफान फटकेबाजीने हिंदुस्थान आशिया चषकापासून एक पाऊल दूर असून आठव्यांदा आशिया चषकाचा किताब आपल्या नावावर करण्यासाठी सज्ज झाला आहे.

बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र हिंदुस्थानी गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे बांगलादेशचा डाव अवघ्या 80 धावांवरच आटोपला. आशिया चषक स्पर्धेचा हा अंतिम सामना रविवारी (दि. 28) सायंकाळी 7 वाजता रंगणार आहे.

रेणुकाचं विकेट्सचं अर्धशतक

रेणुकाने टी-20 क्रिकेटमध्ये 50 विकेट्स पूर्ण केल्या आहेत. रेणुकाने 46 टी-20 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली. रेणुकाने टी-20 क्रिकेटमध्ये  एक वेळा 5 आणि एक वेळा 4 विकेट्स घेतल्या आहेत.