
कायद्याचे उल्लंघन केले म्हणून सर्वोच्च न्यायालयाने गुजरातमधून तडीपार केलेली व्यक्ती देशाचे गृहमंत्री म्हणून कार्य करीत आहे, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केली आहे. यावरून आपण कुठे चाललो आहोत, याचा विचार करण्याची गरज आहे, असेही पवार म्हणाले.
माझे बोट धरून राजकारणात आलो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी मागे म्हणाले होते. आता माझे बोट कोणाला धरु देणार नाही, असे ते म्हणाले. येथे एका कार्यक्रमात पवार बोलत होते.