Champions Trophy 2025 – टीम इंडियाने पाकिस्तानला का जावं? हरभजन सिंगने सुनावले खडे बोल

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे आयोजन पाकिस्तानमध्ये करण्यात आले आहे. हिंदुस्थान आणि पाकिस्तान या दोन देशांमधील राजकीय संघर्ष जगजाहीर आहेत. त्यामुळे टीम इंडिया पाकिस्तानमध्ये जाणार का नाही, हे अद्याप तरी गुलदस्त्यात आहे. मात्र आता या सर्व प्रकरणावर हिंदुस्थानचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने खडे बोल सुनावले आहेत.

टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानमध्ये जाणार का नाही, हे पूर्णपणे केंद्र सरकारच्या निर्णयावर अवलंबून आहे. त्यामुळे बीसीसीआयने अद्याप तरी कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. सरकार जो निर्णय घेईल तोच निर्णय बीसीसीआयच्या माध्यमातून घेतला जाणार आहे. दरम्यान, हरभजन सिंगने बीसीसीआयच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. तो म्हणाला की, टीम इंडियाने पाकिस्तानात का जावे? पाकिस्तानात सुरक्षेचा गंभीर प्रश्न आहे. पाकिस्तानची सध्याची परिस्थिती अशी आहे की तिथे रोजच घटना घडत असतात. त्यामुळे तिकडे जाणे मला सुरक्षित (टीम इंडिया) वाटत नाही. BCCI ची भुमिका पूर्णपणे योग्य आहे आणि खेळाडूंच्या सुरक्षेपेक्षा इतर काहीही महत्वाचे नाही.” असे परखड मत हरभजन सिंगने यावेळी व्यक्त केले.