धावत्या शिवशाही बसने पेट घेतल्याची घटना घडली आहे. ही बस शेगावहून अकोल्याच्या दिशेने जात असताना महामार्ग क्र. 6 वरील तुषार हॉटेलजवळ ही घटना घडली. आगीत ही बस जळून खाक झाली. मात्र चालकाच्या सतर्कतेमुळे बसमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही बस शेगावहून अकोल्याच्या दिशेने जात होती. वाटेत चालकाला काहीतरी जळण्याचा वास आला. त्याने लगेच बस रस्त्याच्या कडेला उभी केली आणि प्रवाशांना बसमधून उतरण्यास सांगितले. त्यानंतर बसने पेट घेतला. रस्त्यावरून जाणाऱया टँकरमध्ये असलेल्या सिलिंडरच्या माध्यमातून चालकाने आग विझवण्याचा प्रयत्न केला. यासाठी काही नागरिकांनी देखील मदत केली. मात्र, त्यांचा हा प्रयत्न अपयशी ठरला. या आगीत बसचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने प्रवासी मात्र सुखरूप आहेत.