शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुबंईकरांच्या भवितव्यासाठी ‘मुंबईला अदानी सिटी होण्यापासून रोखणार’ या मुंबईकरांना दिलेल्या आश्वासनाला प्रतिसाद देत कुर्लावासीय मिंधे सरकार आणि अदानीला जोरदार दणका देणार आहेत. अदानीला दिल्या जाणाऱया कुर्ला येथील मदर डेअरीच्या जागेची मोजणी सरकारच्या वतीने करण्यात येणार आहे. या मोजणीला विरोध करत उद्या शुक्रवारी सकाळी 9 वाजता निषेध आंदोलन केले जाणार आहे. या निषेध आंदोलनात इंडिया आघाडी, महाविकास आघाडी, विविध सेवाभावी संस्था त्याचबरोबर कुर्ला- नेहरूनगरमधील रहिवाशी सहभागी होणार आहेत, अशी माहिती विभागप्रमुख डॉ. महेश पेडणेकर यांनी दिली.