राजस्थानमधील चुरू येथे एका 22 वर्षीय तरुणीने तिच्या काकानेच बलात्कार केला. या नराधम काकाने पीडितेचे अश्लील व्हिडीओ रेकॉर्ड करत ते व्हायरल केले आहेत. या घटनेनंतर पीडित तरुणीने गळफास घेत आत्महत्या केली आहे.
चुरू जिल्ह्यातील रामगढ गावात ही घटना घडली असून पोलिसांनी तरुणीच्या आई वडिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर नराधम काकाला अटक केली आहे.