Rain Update : ठाणे, रत्नागिरी, रायगडात शाळा- महाविद्यालयांना सुट्टी

हवामान खात्याने येत्या 24 तासात मुंबई, मुंबई उपनगर, रत्नागिरी, पालघर ,ठाणे या जिल्ह्यांना पुढील 24 तास अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाणे, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

राज्यातील बहुतांश भागांना गुरुवारी अतिमुसळधार पावसाने झोडपले असून अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान हवामान खात्याने येत्या 24 तासात मुंबई , मुंबई उपनगर, रत्नागिरी, पालघर ,ठाणे या जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. सरकारने याबाबत नागरिकांना मेसेज पाठवून सतर्क केले आहे.