बोरिवली पूर्वेकडील कनाकिया टॉवरला आग लागली असून या आगीत एकाचा गुदमरून मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले आहेत. महेंद्र शहा (70) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर रंजना राजपूत, शिवानी राजपूत आणि शोभा साळवे असे तिघे जखमी झाले असून त्यांना स्थानिक अॅपेक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.