पावसामुळे ठाणे पोलीस भरतीची मैदानी चाचणी पुढे ढकलली, जाहीर झाल्या नव्या तारखा

पोलीस भरती. प्रातिनिधीक छायाचित्र.

सध्या महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू असून अनेक शहरांना हवामान खात्य़ाने रेड अलर्ट दिला आहे. ठाण्यात 26 व 27 जुलैला पोलीस भरतीसाठी महिलांची मैदानी चाचणी होणार होती. मात्र ठाण्यात येत्या दोन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असल्याने ही चाचणी पुढे ढकलण्यात आली आहे.

ठाणे शहर पोलीस भरतीसाीठी 26 जुलै व 27 जुलैला साकेत मैदान राबोडी, ठाणे येथे महिलांची शारिरीक मोजमाप व मैदानी चाचणी होणार होती. मात्र पावसामुळे ही चाचणी पुढे ढकलली आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाकडून एक पत्रक जारी करत महिलांची मैदानी चाचणी रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी आता 1 ऑगस्ट आणि 2 ऑगस्टला ही मैदानी चाचणी होणार आहे.