ज्येष्ठ मराठी साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचं दीर्घ आजाराने निधन

ज्येष्ठ मराठी साहित्यिक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे निधन झाले आहे. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

फादर फ्रान्सिस दिब्रोटो मागील काही वर्षांपासून आजारी होते. वसईत त्यांनी गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. ते 82 वर्षांचे होते.

दिब्रिटो यांचे मराठी साहित्य आणि पर्यावरण चळवळीमध्ये मोलाचे योगदान राहिले आहे. धाराशीव येथे पार पडलेल्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे दिब्रिटो अध्यक्ष होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास जेलाडी येथील त्यांच्या घरी ठेवण्यात येणार आहे. होली स्पिरिट चर्च (नंदाखाल) येथे त्यांचे अंत्यदर्शन घेता येईल. त्यानंतर सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.