#PuneRains: जलमय पुणे; खडकवासल्यातून मुठा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग, नागरिकांची सुरक्षित स्थळी धाव

pune flood news
फोटो - चंद्रकांत पालकर, पुणे

पुण्यातील खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. आज सकाळी हा विसर्ग वाढवण्यात आला.  27203 क्युसेक्स विसर्ग वाढवून सकाळी 6:00वा. 35574 क्यूसेक्स करण्यात आला आहे. ज्यामुळे शहरातील अनेक भाग जलमय झाला आहे.

सिंहगड रोडवरील सोसायट्यांना याचा अधिक फटका बसल्याचं दिसत आहे. सिंहगड रोडवरील विठ्ठल नगर परिसरात पाणी शिरलं आहे. तर एकता नगरी भागातील द्वारका, जलपुजन, शारदा सरोवर, शाम सुंदर सोसायटीत पुराचे पाणी शिरले. पार्किंग परिसर पाण्यात गेल्यानं नागरिकांना त्यातूनच रस्ता काढावा लागत आहे. तर लोकांची सुरक्षित स्थळी जाण्यासाठी धावपळ सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.

सामना न्युज एक्सप्रेस | Saamana News Express