महंत माधवाचार्य यांच्यावर हल्ल्ला

मालाड पूर्वच्या हनुमान मंदिर येथे असलेले महंत माधवाचार्यजी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कुरार पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

महंत माधवाचार्यजी हे मठाधिपती आहेत. त्यांच्या सांगण्यानुसार मंदिर आणि गौशाळेचा कारभार चालतो. महंत माधवाचार्यजी हे तपोवन मंदिरात नित्यनियमाने पहाटे पूजाअर्चा, होमहवन करत असतात. त्या आश्रमात 20 ते 25 साधुसंत येऊन जाऊन असतात. मंगळवारी रात्री माधवाचार्यजी हे धुनी मंदिरात हवन करत होते. पहाटेच्या सुमारास एक जण तेथे आला. अचानक माधवाचार्यजीनी मदतीसाठी आरडाओरड केली. त्यानंतर तेथे मंदिरात असलेला सुरक्षा रक्षक गेला. त्याला सुरक्षा रक्षकाने एका हल्लेखोराला पकडले. त्यानंतर हल्लेखोराने सुरक्षा रक्षकासोबत झटापट करून पळ काढला.

सुमारे दोन महिन्यांपूर्वी गौशाळेत सूर्यनारायण नावाची व्यक्ती कामाला होती. गाईचे दूध चोरून बाहेर विकल्याप्रकरणी त्याला महंतांनी कामावरून काढून टाकले होते. त्यातूनच त्याने महंतांवर हल्ला केला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.