ब्रिटनमध्ये किंग चार्ल्स यांच्या सुरक्षा दलातील घोडय़ाने एका पर्यटकाचा चावा घेतल्याची घटना घडलीय. सेंट्रल लंडनमधील व्हाइट हॉलच्या बाहेर एक महिला फोटो काढत होती तेव्हा चार्ल्स यांचा रक्षक घोडय़ावर होता. अचानक घोडय़ाने महिलेच्या उजव्या हाताला चावा घेतल़ा या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
विशेष म्हणजे ज्या फलकाजवळ घोडा उभा आहे, तेथे सावधगिरीचा संदेश देणारा फलक आहे. त्यावर ‘सावध राहा, घोडा तुम्हाला चावू शकतो. त्याला हात लावू नका’ असे लिहिलेय. तरीही पर्यटक या संदेशाकडे दुर्लक्ष करतात.