ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकर ही तिच्या अभिनयामुळे, तिच्याबद्दलच्या गॉसिपमुळे अनेकदा चर्चेत असते. सईने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे.
मराठीसह हिंदी चित्रपटांमध्ये सई काम करतेय. सईच्या कामासह चर्चा असते ती तिच्या फोटोशूटची.
नुकतेच सईने काळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये फोटो शेअर केले आहेत.
यावेळी तिने काळ्या रंगाचा वनपीस घातला आहे. यासह तिने तिच्या आऊटफीटला शोभेल असा लाईट मेकअपही केलाय. सोबतच तिने आपल्या या ड्रेसवर हाय हिल्स घातले आहेत.
हे फोटो शेअर करताना सईने ब्लॅक इज बॅक असे कॅप्शनही दिले आहे.
या ड्रेसमध्ये सई कमालीची सुंदर दिसत आहे. सध्या तिच्या या लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.