इम्रान खान यांचे पक्ष कार्यालय सील

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाच्या कार्यालयावर सुरक्षा दलांनी छापा टाकला. मिळालेल्या माहितीनुसार सुरक्षा दलांनी कार्यालय सील केले. तसेच पक्षातील अनेक नेते आणि कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. त्यात पीटीआयचे माहिती सचिव रऊफ हसन यांचाही समावेश आहे. काही दिवसांपूर्वी पक्षाध्यक्ष गौहर खान यांनी सुरक्षा दलांवर गेल्या दोन महिन्यांत पक्षाच्या 10 मोठय़ा नेत्यांचे अपहरण केल्याचा आरोप केला होता.

याशिवाय पोलिसांनी महिला कर्मचाऱयांना बळजबरीने वाहनात बसवले. ही कारवाई अशा वेळी करण्यात आली आहे, जेव्हा तुरुंगात डांबलेल्या इम्रान यांनी आठवडाभरापूर्वी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या विरोधात आपला पक्ष देशभरात मोठय़ा प्रमाणात निदर्शने करणार असल्याचे सांगितले होते. यापूर्वी इम्रान खान यांना 3 प्रकरणांमध्ये जामीन मिळाल्यानंतर यूएनने म्हटले होते की, इम्रान खान यांना बेकायदेशीरपणे तुरुंगात ठेवण्यात आले आहे.