
प्रोबेशनरी अधिकारी पूजा खेडकर यांना दोनदा समन्स बजाविण्यात आल्यानंतरही त्या पुण्यात जबाब नोंदविण्यासाठी आलेल्या नाहीत. खेडकर सध्या नॉट रिचेबल असल्याचे बोलले जात आहे.
प्रशिक्षणार्थी खेडकर यांनी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याविरुद्ध वाशीममध्ये छळवणुकीची तक्रार दिली होती. तक्रारीच्या अनुषंगाने खेडकर यांनी पुणे पोलिसांकडे जबाब नोंदविण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, त्या अद्यापही पोलिसांसमोर हजर झालेल्या नाहीत. दरम्यान, मसुरीच्या लालबहादूर शास्त्री अॅकॅडमीत हजर राहण्यासाठी पूजा खेडकर यांना आधीच यूपीएससीत नोटीस बजावली होती.