मॉर्निंग वॉकला गेलेल्या अल्पवयीन मुलीला पाहून एकाने अश्लील कृत्य केल्याची संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी जुहू पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
मिंधे सरकारच्या काळात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. समाजकंटकांना कायद्याचा धाकच उरला नाही. मुंबईसारख्या महानगरात रस्त्याने जाणाऱया अल्पवयीन मुलीला पाहून नकोसे कृत्य केले गेल्याची घटना घडली आहे. दोन दिवसांपूर्वी एक अल्पवयीन मुलगी मार्ंनग वॉकला गेली होती. ती जुहू चर्च परिसरातून जात असताना अज्ञात व्यक्तीने वेगवेगळय़ा प्रकारचे आवाज काढून तिचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर एकाने दुरून अश्लील कृत्य करून जवळ बोलावण्यासाठी इशारा केला. त्या घटनेने ती मुलगी घाबरली. घडल्याप्रकरणी मुलीने याची माहिती मुंबई पोलिसांना ‘एक्स’वरून दिली. याप्रकरणी जुहू पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.