घरासाठी आतापर्यंत 98 हजार गिरणी कामगार पात्र

गिरणी कामगारांना हक्काचे घर देण्यासाठी म्हाडाकडून सुरू असलेल्या पात्रता निश्चिती अभियानासाठी आतापर्यंत ऑनलाईन आणि ऑफलाईन असे मिळून म्हाडाकडे तब्बल 1 लाख 11 हजार 976 गिरणी कामगारांनी अर्ज सादर केले आहेत. त्यापैकी 98 हजार 508 कामगार घरासाठी पात्र झाले आहेत.

मुंबईतील बंद पडलेल्या  58 गिरण्यांमधील कामगारांना मोफत घरे देण्याचा निर्णय 2001 मध्ये राज्य सरकारने घेतला होता. त्यानुसार आतापार्यंत 17 हजार कामगारांना गिरण्याच्या जागेवर लॉटरीच्या माध्यमातून घरे मिळाली आहेत. यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या एकूण दीड लाख गिरणी कामगार व त्यांच्या वारसांच्या घरांचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. दरम्यान, म्हाडाकडून सप्टेंबरपासून गिरणी कामगारांची घरासाठी पात्रता निश्चिती अभियान सुरू आहे. या विशेष अभियानात 23 जुलैपर्यंत म्हाडाकडे आतापर्यंत गिरणी कामगार व त्यांच्या वारसांकडून 1 लाख 11 हजार 976 अर्ज आले आहे. त्यापैकी 98 हजारहून अधिक कामगारांची पात्रता निश्चित झाली आहे. उर्वरित अर्जाची छाननी करून पात्र-अपात्र निश्चितीची कार्यवाही सुरू आहे.