व्हॉट्सअॅपने आपल्या यूजर्ससाठी आणखी नवीन फीचर आणले आहे. हे फीचर स्टेटससंबंधित असून नव्या फीचरमुळे यूजर्संना स्टेटस लावताना बॅकग्राऊंडमध्ये आपोआप ग्रेडियंट येईल. यासंबंधीची माहिती शेअर करण्यात आली असून हे फीचर सध्या तरी बीटा टेस्टर्ससाठी आहे. तसेच अँड्रॉयड बीटा 2.24.15.11 व्हर्जनसाठी आहे. या नवीन अपडेटमध्ये स्टेटसमध्ये नवीन इंटरफेस पाहायला मिळेल. यात स्टेटस लावल्यानंतर स्क्रीन वेगळी दिसेल. स्टेटस लावल्यानंतर बॅकग्राऊंडवर ऑटोमेटिकली ग्रेडियंट येईल. तसेच स्क्रीनला म्यूट करणे, स्टेट्सला सपोर्ट करण्याचा ऑप्शन दिसेल. नवीन स्टेट्स अपडेट फीचर गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. डब्ल्यूबीने याचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. व्हॉट्सअॅपवर लवकरच यूजर्सला युनिक यूजरनेम फीचरची सुविधा मिळणार आहे. यात एक दुसऱ्यांसोबत चॅटिंग करण्यासाठी मोबाईल नंबर सेव्ह करण्याची गरज उरणार नाही. कंपनी लवकरच हे नवीन फीचर रोलआऊट करणार आहे.