![Mobile Recharge](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/07/Mobile-Recharge-696x447.jpg)
टेलिकॉम कंपन्यांनी 3 जुलै रोजी टॅरिफच्या दरात वाढ केल्यानंतर मोबाईल रिचार्च महाग झाले आहेत. परंतु, टेलिकॉम कंपन्या पुढील 12 महिन्यात आणखी मोबाईल रिचार्जचे दर महाग करणार आहेत.
दूरसंचार कंपन्या रिलायन्स जियो, भारती एअरटेल आणि व्होडापह्न-आयडिया यांचा प्रति यूजर्स सरासरी महसूल 182 ते 220 पर्यंत म्हणजेच 15 टक्क्यांपर्यंत वाढवणार आहे. टेलिकॉम कंपन्या आरपीयू 300 रुपयांच्यावर नेण्याची तयारी करत आहेत. त्यामुळे टेलिकॉम कंपन्यांनी दर वाढवायला सुरुवात केली आहे. दूरसंचार कंपन्या पुढील काही वर्षांत प्रति वापरकर्ता उत्पन्न 80 रुपयांनी वाढवण्याच्या रोडमॅपवर काम करत आहेत. आरपीयूमध्ये प्रत्येक 1 रुपया वाढीमुळे दूरसंचार उद्योगाचा नफा एक हजार कोटींनी वाढू शकतो, असे केअरएज रेटिंग्सने म्हटले आहे. 2028-19 मध्ये दूरसंचार कंपन्यांचे प्रति वापरकर्ता सरासरी उत्पन्न 100 रुपये होते. 2023-24 या आर्थिक वर्षात ते वाढून 182 रुपये झाले. यामध्ये 86 टक्के हिस्सा 4जीचा होता आणि सुमारे 14 टक्के हिस्सा 5जीचा होता.
देशात इंटरनेटचा वापर झपाटय़ाने वाढला. आता 5जी सेवा सुरू झाली आहे. 2018-19 आणि 2022-23 दरम्यान दूरसंचार उद्योगाच्या उत्पन्नात 1 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
प्रति वापरकर्ता महसूल 300 रुपयांच्यावर पोहोचल्यानंतरही, हिंद्स्थान जगातील सर्वात स्वस्त टेलिकॉम मार्केट राहील, असे भारतीचे अध्यक्ष सुनील भारती मित्तल यांनी म्हटले आहे.