
चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने कहर केला असून नदी, नाल्यांना पूर आला आहे. अशातच सिंदेवाही तालुक्यातील कुकडहेटी येथील सोनी खितेंद्र मेश्राम (30) या 5 महिन्याच्या गर्भवती महिलेची काल अचानक प्रकृती बिघडली. तिला अतिरक्तदाबाचा त्रास होत होता. प्रकृती गंभीर असल्याने तिला ग्रामीण रूग्णालयात दाखल करणे गरजेचे होते. मात्र, सिंदेवाही तालुक्यातील नदी, नाल्यांना पूर आल्याने बहुतेक गावांचा तालुक्याशी संपर्क तुटलेला होता.
अशा परिस्थितीत घाबरलेल्या कुटुंबीयांना धीर देत जामसाळा गावातील तरूणांनी सामाजिक बांधिलकी जोपासत गर्भवती महिलेला खाटेवर झोपवून सती नदीवरील पुरातून मार्ग काढून, गर्भवती महिलेस खासगी वाहनाने सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
View this post on Instagram