Nagar भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात खासदार नीलेश लंकेंचं दुसऱ्या दिवशीही उपोषण सुरू; डॉक्टरांकडून तपासणी

पोलीस अधीक्षक कार्यालयापुढे आमरण उपोषण करणाऱ्या खासदार नीलेश लंकेंची जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या पथकाने तपासणी केली. या तपासणीत खासदार लंकेचा ब्लड प्रेशर वाढल्याचं तसेच रक्तातील साखरेची पातळी वाढल्याची नोंद शासकीय डॉक्टरांनी केली आहे.

खासदार लंकेसोबत माजी नगरसेवक योगीराज गाडे आणि अशोक रोहोकले हे आमरण उपोषण करत आहे. अशोक रोहोकले यांची देखील रक्तातील साखरेची पातळी वाढली आहे.

जिल्हा पोलीस प्रशासनातील स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टाचाराविरोधात खासदार नीलेश लंके यांनी सोमवारपासून पोलीस अधीक्षक कार्यालयापुढे उपोषण सुरू केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे.

याआधी उपोषणादरम्यान सामान्य नागरिकांनी पोलिसांविरोधात केलेल्या तक्रारींचा अक्षरशः धो-धो पाऊस पडला. दरम्यान, पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांची बदली तसेच अवैध व्यवसाय बंद झाल्याशिवाय माघार नाही, अशी भूमिका खासदार लंके यांनी माध्यमांशी बोलताना मांडली. दरम्यान, उपोषणापूर्वी आंदोलकांनी पोलिसांच्या कारभाराचा निषेध करत प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून निषेध नोंदवला.