Budget 2024 Nirmala Sitharaman: अर्थसंकल्पावर शेअर बाजाराची नाराजी, 700 अंकांची घसरण

आज देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2024) मांडण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपल्या कार्यकाळातील सलग सातवा अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्री काय घोषणा करणार याकडे सगळ्यांचे लक्ष्य लागलं आहे. शेअर बाजारावरही याचा परिणाम दिसून आला असून बाजारात चांगलीच पडझड पाहायला मिळत आहे. मुंबई शेअर बाजारात जवळपास 700 अंकांची घसरण झाली आहे. निफ्टीही 24350 वर पोहोचला आहे.

दिवसाच्या सुरुवातीला शेअर बाजारात चांगला उत्साह पाहायला मिळाला. सरकारी कंपन्यांचे शेअर्स (PSU Stocks) प्रचंड वेगाने पुढे जाताना दिसले. मात्र, हा उत्साह फार काळ टिकू शकली नाही. सकाळी 09.45 वाजता निर्देशांक जवळपास 50 अंकांनी घसरला, निफ्टीही रेड झोनमध्येच पाहायला मिळत आहे.

लाँग टर्म कॅपिटल गेन (LTCG) कर 12.50 टक्के वाढण्यात आल्याची घोषणा आज करण्यात आली, जो पूर्वी 10 टक्के होता.

त्यासोबतच निवडक असेटवर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन (STCG) 20 टक्के करण्यात आला आहे.

सकाळी 10.25 वाजता सेन्सेक्स 115 अंकांनी घसरत होता, तर निफ्टी 50 अंकांपेक्षा अधिक घसरत होता.

या कंपन्यांनी भाव खाल्ला

NTPC आणि BHEL ला बजेटमध्ये एक मोठे काम मिळाले आहे, दोघे मिळून सुपर अल्ट्रा थर्मल पॉवर प्लांट (UMPP) उभारणार आहेत. या घोषणेमुळे या दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली आहे.

याआधी सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली.