सब ज्युनिअर, ज्युनिअर राज्यस्तरीय निवड चाचणी जलतरण स्पर्धा; मुंबई संघाला विजेतेपद, पुणे उपविजेते

मुंबई संघाने सर्वाधिक 330 गुणांची कमाई करीत सब ज्युनिअर आणि ज्युनिअर राज्यस्तरीय निवड चाचणी जलतरण स्पर्धेत अव्वल क्रमांक पटकावत सर्वसाधारण विजेतेपद संपादन केले. यजमान पुणे संघाने 280 गुणांसह उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

पुण्यातील टिळक तलाव येथे ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेत तिसर्या दिवशी 50 मीटर बटरफ्लायमध्ये 17 वर्षांखालील मुलांच्या गटात पुण्याच्या वेदांत तांदळे (00.26.57से) याने पहिला क्रमांक पटकावला. याचबरोबर 100 मीटर बटरफ्लायमध्ये वेदांत तांदळे (00.57.04से.) याने विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट पटकावला. 50 मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात 11 वर्षांखालील मुलांच्या गटात मुंबईच्या अबीर सेठ (00.36.95से) याने विजेतेपद पटकावले.