कोपरगावात धक्कादायक घटना घडली असून पत्नीबरोबर प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. कोपरगाव शहर पोलिसांनी सहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तीन आरोपींना अटक करण्यात आली असून तीन आरोपी फरार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (21 जुलै) रात्री साडेआठच्या सुमारास टॉवरजवळील भूमी अभिलेख कार्यालयजवळ पत्नीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरुन सोहेल हारुन पटेल (28) याला मारहाण करण्यात आली. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत. ते सोहेलला गाडीत टाकून कर्मवीर नगरमध्ये जावेद जमशेर शेख याच्या शेतात असणाऱ्या प्लॉटमध्ये घेऊन गेले. तिथे सोहेलला लाकडी दांड्याने, चाकूने, लोखंडी खिळे असलेल्या बांबुने मारहान करून त्याची हत्या करण्यात आली. याप्रकरणी मयत सोहेलचा भाऊ शाहरूख हारुन पटेल (वय 25) याने कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती. सदर फिर्यादीवरून आरोपी मच्छिद्र सोनवणे ऊर्फ मच्छु, स्वप्नील गायकवाड, महेश कट्टे, विकी परदेशी, योगेश जाधव ऊर्फ पोंग्या आणि अन्य एकाविरोधात IPC कलम 103(1), 118(1), 142, 140(1), 189(2), 189(4), 190, 191(2) आणि 191(3) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरिक्षक प्रदिप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा करत आहेत.