![dhiraj farade bhandara](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/07/dhiraj-farade-bhandara-696x447.jpg)
>> सूरज बागड, भंडारा
भंडारा जिल्ह्यातील सैनिकी शाळा केसलवाडा वाघ येथे असून धीरज सिताराम फरदे वय 10 वर्ष हा सैनिकी विद्यालय केसलवाडा येथे शिकत होता. धीरज फरदे 9 व्या वर्गात शिकत होता. ही निवासी शाळा असून 600 ते 700 विद्यार्थी इथे शिकत असतात.
शाळेला सुट्टी असताना सगळे विद्यार्थी वस्तीगृहामध्येच होते. तेव्हा मागील बाजूने कर्मचारी विनायक सिंगनजडे हे फिरत असताना त्यांना अचानक काही पडल्याचा आवाज आल्याने धावत गेले असता नामे धीरज फरदे हा जखमी अवस्थेत खाली पडलेला आढळला. त्यांनी तातडीने विद्यार्थ्यांना बोलावून ॲम्ब्युलन्सने लाखनी सरकारी दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याचा मृतदेह शवविच्छेदनाला पाठविण्यात आला आहे, याची माहिती लाखनी पोलीस स्टेशनला दिली.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून चौकशी केली. तेव्हा वस्तीगृहातील पहिल्या मजल्यातील खिडकी मधून उतरून घरी पळून जाण्याच्या बेतामध्ये तो खाली पडल्याची घटना पुढे आली आहे. धीरज फरदेहा नवेगाव बांध येथील रहिवासी आहे. ह्या घटनेमुळे परिवारावर शोककळा पसरली आहे.