छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थानापन्न करण्यासाठी उमरखेड येथे शिवप्रेमींचं नगर परिषदेवर ठिय्या आंदोलन

>> प्रसाद नायगावकर, यवतमाळ

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थानापन्न करण्याच्या मागणीसाठी उमरखेड येथे शिवाप्रेमींनी नगर परिषदवर मोर्चा काढत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. 2022 साली महाराजांचा अश्वारूढ पुतळा उमरखेड नगर परिषदने मागावीला होता. पण स्थानिक राजकारणामुळे हा पुतळा स्थानापन्न करण्यास विलंब होत आहे. यामुळे शिवप्रेमी प्रचंड संतापले आहेत.

मागील 3 वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उमरखेड नगर परिषदेने कोणत्याही प्रकारची जागा उपलब्ध नसतांना तत्कालीन संत्ताधाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शहरामध्ये आणून नगर परिषद मधील अग्नीशामकाच्या गॅरेज मध्ये 7 फुट खोल खडडा करून बंदिस्त करून ठेवलेला आहे, ती छत्रपती शिवाजी महाराज यांची विटंबना आहे त्यामुळे मागील 3 वर्षापासून सर्व शिवप्रेमींच्या भावना दुखविल्या गेल्या आहेत. परंतु आता महाराजांचा अपमान सहन करणार नाही. याबाबत मागील बरेच आंदोलने व निवेदन दिली परंतु सदर जागा ही कोर्टात आहे त्यामुळे सदर जागेवर सध्या छत्रपतींचा पुतळा बसविता येणार नाही, अशी दिशाभुल करण्याचा प्रयत्न उमरखेड नगर परिषद प्रशासनाकडून वांरवार होत आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयासाठी 4000 चौ. फुट जागा उपलब्ध आहे व त्यापैकी 800 चौ. फुट जागेचे न्यायालयीन प्रकरण सुरू असून ती जागा आज रोजी कोर्टात न्यायप्रविष्ठ आहे. परंतु नगर परिषदेकडे असलेल्या प्रस्तावित नकाशानुसार छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हा सदर 800 चौ. फुट जागा सोडून मागील बाजूस असलेल्या 3200 चौ. फुट मध्ये आहे व जागा आज रोजी कोणत्याही प्रकारच्या न्यायालयीन वादात नाही. त्यामुळे 3200 चौ. फुट जागेवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवावा अशी मागणी शिवप्रेमी संघटनेने केली आहे.

उमरखेड येथे छत्रपती शिवाजी महाराजंचा पुतळा बसाविण्यास अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. आणि ही बाब नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. नगर परिषदेने पुण्यातील मूर्ती कारागीर सुभाष यांचे 18 लाख रुपये अद्याप दिले नाही. ते सध्या उपोषणावर बसले आहेत. तर यासंदर्भात नागपूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठ येथे सुनावणी सुरू आहे. हे प्रश्न तात्काळ निकाली काढावे अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलनाचा इशारा शिवप्रेमींनी दिला आहे.