
राज्याच्या वाशिम जिल्ह्यात सोमवारी एका कुत्र्याने तीन मुलांसह आठ जणांना चावा घेतला, या घटनेनंतर संतप्त झालेल्या लोकांच्या जमावाने त्याला ठार मारले.
वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरातील रस्त्यावरून चालणाऱ्या आठ जणांना कुत्र्याने चावा घेतला. यामध्ये एक 70 वर्षीय वृद्ध गंभीर जखमी झाले. इतकेच नाही तर घरासमोर खेळत असलेल्या तीन मुलांवरही कुत्र्याने हल्ला केला. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
या घटनेनंतर सर्व जखमींना वाशिम येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
एका पाठोपाठ घडलेल्या घटनांची माहिती वाऱ्याच्या वेगानं शहरात पसरली. कुत्र्याची दहशत संपवण्यासाठी लोकांनी त्या कुत्र्याला ठार केले, अशी माहिती मिळते.